Monday, April 22, 2019

कुपन दाखवा, सवलत मिळवा - जागतिक पुस्तक दिनाच्या


कुपन दाखवा, सवलत मिळवा - जागतिक पुस्तक दिनाच्या

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील नामवंत प्रकाशकांची पुस्तके वाचकांना सवलतीमध्ये उपलब्ध होणार आहेत.

मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' कायमच बांधील आहे. ही बांधिलकी जपताना वाचनसंस्कृती जपली जावी, हासुद्धा 'महाराष्ट्र टाइम्स'चा आग्रह आहे. यासाठी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील नामवंत प्रकाशकांची पुस्तके वाचकांना सवलतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये छापून आलेले कुपन दाखवून २३ ते २५ एप्रिल या कालावधीमध्ये ही सवलतीत पुस्तकखरेदी करता येईल.

पुस्तक दिनानिमित्त सवलतखरेदीमध्ये मॅजेस्टिक प्रकाशन, ज्योत्स्ना प्रकाशन, मौज प्रकाशन, राजहंस प्रकाशन आणि जवाहर बुक डेपो यांनी सहभाग नोंदवला आहे.



No comments:

Post a Comment