Sunday, August 4, 2019

गुगल सर्चमध्ये स्मार्ट रिझल्ट्ससाठी करून पाहा या ट्रिक्स व टिप्स | Check out these Tricks and Tips for Smart Results in Google Search


गुगल सर्चमध्ये स्मार्ट रिझल्ट्ससाठी करून पाहा या ट्रिक्स  टिप्स 
 
Check out these Tricks and Tips for Smart Results in Google Search
 
 
 

गुगल सर्च मनासारखे निष्कर्ष देत नसेल तर काही खास पद्धती आणि ट्रिक्स वापरून पाहू शकता

गुगलच्या अपार क्षमतेचा बहुतांश युजर्संना फारसा उपयोग करुन घेता येत नाही. कारण वेब वर योग्य स्टफ सर्च करणे प्रत्येकास शक्य नसते. येथे काही टिप्स, ट्रिक्स फीचर्स देण्यात येत आहेत. त्याद्वारे तुम्ही चांगले सर्च करू शकता.

> कोट्स हायफनचा वापर
खूप सखोल सर्च करूनही चांगले रिजल्ट्स मिळत नसतील तर सर्चला रिफाइन करा. म्हणजे एखाद्या गाण्यांची ओळ कोट्स म्हणून टाइप करा. जर एखाद्या व्यक्तीचे नाव शोधायचे आहे, परंतु त्यास मिळते-जुळते शहर अथवा कंपनी सर्च रिजल्टमध्ये नको असेल तर नावाआधी हायफन लावले तर रिझल्टस येतात.

> आपल्या आवडीच्या जास्त साइट्स शोधा
एखाद्या वेबसाइटसारखीच अन्य दुसऱ्या वेबसाइट्स शोधण्यासाठीरिलेटेडऑपरेटरचा वापर करा. तुम्ही फास्ट कंपनी. कॉम लिहून सर्च करा. येथे कॉलन साइटदरम्यान कोणतीही स्पेस नको. यामुळे त्या साइटसची यादी येईल. त्यांना गुगलन तुमच्या आवडीच्या साइट्स दिले तितकेच स्टार दिलेले असतात.

> इमेज सर्च चांगली करणे
एखाद्या इमेजमध्ये जास्त रेफरन्सेसची गरज असेल तर त्याला आधी संगणकावर डाऊनलोड करा. नंतर गुगल इमेजेसवर सर्च बारमध्ये ड्रॅग करा. त्या इमेजसंबंधी सर्च रिजल्ट्स मिळतील. शिवाय आणखी इमेजेस मिळतील. दुसरे सर्च बारमध्ये कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून संबंधित इमेजचा यूआरएल पेस्ट करा.

> विविध फाइल टाइप्ससाठी सर्च रिझल्ट्स
वेब एक मोठे स्टोअरेज कंटेनरचेही काम करते. तुम्ही वेगवेगळ्या फाइल्स टाइप्ससाठी सर्च करून सहजपणे कागदपत्रे, प्रझेंटेशन्स, स्प्रेडशीट्स इत्यादी शोधू शकता. विशेषनाम असलेली पीडीएफ फाइल्सचे उदाहरण शोधण्यासाठी सर्चमध्ये तुम्हालाफाइलटाइपऑपरेटर अॅड करावे लागेल.

> जास्त गुगलिंग करण्याची गरज नसणार
एकाच प्रकारची माहिती जर आपल्याला सर्च करायची असेल तर गूगल अलट्र्स सर्विसेसचा उपयोग करणे चांगले राहिल. माहिती शोधण्यासाठी शब्द टाकल्यास जेव्हाही याच्याशी संबंधीत नवीन माहिती उपलब्ध होईल तेव्हा त्याची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळेल. शो ऑप्श्न्सच्या लिंकवर जावून याची निवड करता येईल. आपल्याला किती वेळा नोटिफिकेशन आिण कोणते मार्ग (ब्लॉग्स, साइट्स, वीडियो आदी), भाषा पाहिजेत हे ठरवा.

No comments:

Post a Comment