Wednesday, August 28, 2019

गॅझेटिअरची डिजिटल युगाकडे वाटचाल


गॅझेटिअरची डिजिटल युगाकडे वाटचाल

. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारच्या गॅझेटिअर विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्राकृतिक भूस्वरूप, वनसंपदा, स्थळांची माहिती प्रकाशित केली जाते. मात्र ही माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. यासाठी मंगळवारी गॅझेटिअर विभागात सुरू झालेल्या सेतू माधवराव पगडी संदर्भ ग्रंथालयासोबतच गॅझेटिअर अॅपचेही लोकार्पण करण्यात आले. सध्या या अॅपवर दहा गॅझेटिअर उपलब्ध आहेत. यासोबतच गॅझेटिअर विभागातील संदर्भग्रंथांचेही डिजिटायझेशन प्रस्तावित आहे.

गॅझेटिअर विभागाने तयार केलेल्या अॅपमध्ये लँड अँड पीपल, हिस्ट्री - एन्शन्ट पीरियड, मीडिएव्हल पीरियड, मराठा पीरियड, प्रवरा खोरे, रायगड जिल्हा गॅझेटिअर, नागपूर जिल्हा गॅझेटिअर, चरित्रकोश - मराठवाडा आणि विदर्भ विभाग या गॅझेटिअरचा समावेश आहे. यातील काही संदर्भग्रंथ पीडीएफ, तर काही संदर्भग्रंथ -पब स्वरूपातही उपलब्ध आहेत. यामध्ये अजूनही काही त्रुटी आहेत. काही संदर्भग्रंथ -पब स्वरूपात किंवा पीडीएफ स्वरूपात मोबाइलवर पाहता येत नाहीत. मात्र उपलब्ध माहितीबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याचे काम या अॅपच्या माध्यमातून होईल. विभागाने आत्तापर्यंत ८४ -बुक प्रकाशित केली आहेत. यातील काही -बुक सीडी स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत.

हा विभाग लोकाभिमुख व्हावा, गॅझेटिअरची ओळख लोकांना व्हावी अशी अपेक्षा या विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांनी व्यक्त केली. मंगळवारी उद्घाटन करण्यात आलेल्या गॅझेटिअरच्या संदर्भ विभागात हजार ६०० ग्रंथ तसेच मासिके, त्रैमासिके आहेत. या पुस्तकांचेही डीजिटायझेशन करण्यात येणार आहे. ही पुस्तके ग्रंथालयामध्ये कम्प्युटरवर उपलब्ध करून देण्यात येणार असून महत्त्वाचा शब्द दिला की संबंधित पाने या माध्यमातून वाचकांसमोर उपलब्ध होतील आणि आवश्यक त्या पानांचे प्रिंट आऊट घेता येईल, असेही बलसेकर यांनी स्पष्ट केले. वाचकांसाठी, अभ्यासक, संशोधकांसाठी हे संदर्भग्रंथ विनामूल्य उपलब्ध आहेत. सकाळी १०.३० ते सायं. .३० या वेळेत काळा घोडा येथील बरजोरजी भरुचा मार्गावरील गॅझेटिअर विभागामध्ये हे संदर्भग्रंथ पाहता येणार आहेत. या संदर्भ ग्रंथालयाच्या उपलब्धीसोबतच हळूहळू अभ्यासकांसाठी कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत.

सध्या या संदर्भ ग्रंथालयाची जागा लहान आहे. मात्र वाचक, अभ्यासकांची संख्या वाढल्यास हे ग्रंथालय विभागातील दुसऱ्या जागेत हलवण्यात येईल, असे बलसेकर यांनी सांगितले. यासंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी, जागा लहान असली तरी प्रकल्प चांगला असेल तर जागेला फार महत्त्व नसते. ही जागा मोक्याच्या ठिकाणी असून इथे लोक मोठ्या प्रमाणात येतात, असे स्पष्ट केले. त्याचवेळी याच परिसरामध्ये मोठी जागा मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असेही आश्वासन त्यांनी संदर्भ ग्रंथालयाच्या उद्घाटनाच्या वेळी दिले.

- भीमा खोऱ्यासंदर्भात गॅझेटिअरवर काम सुरू
- या गॅझेटिअरमध्ये २०५१ मध्ये खोऱ्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज दिला जाईल
- महाराष्ट्राची चित्रकला गॅझेटिअरवर काम सुरू
- टिंबर विषयावर गॅझेटिअर काढण्यात येणार
- महाराष्ट्र - यात्रा आणि उत्सव (कोकण विभाग) गॅझेटिअर अंतिम टप्प्यात
- जुलैमध्ये महाराष्ट्र - यात्रा आणि उत्सव (विदर्भ विभाग) गॅझेटिअर प्रकाशित झाले

Source | महाराष्ट्र टाइम्स

Regards

Mr. Pralhad Jadhav  
Master of Library & Information Science (NET Qualified) 
Research Scholar (IGNOU)
Senior Manager @ Knowledge Repository  
Khaitan & Co 
Twitter Handle | @Pralhad161978
Mobile @ 9665911593

No comments:

Post a Comment