इंग्रजी शब्दांचे मराठीतून अर्थ हवेत, मग डाऊनलोड करा 'हा' ॲप
भाषा संचालनालयाचे शासन शब्दकोश ॲप
मुंबई, दि. 1
विज्ञान व तंत्रज्ञानात होत असलेला विकास विचारात घेता, मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा या उद्देशाने मंत्री मराठी भाषा यांच्या प्रेरणेने व प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भाषा संचालनालयाने, निवडक शब्दकोशांचा समावेश असलेला शासन शब्दकोश भाग-1 हा भ्रमणध्वनी उपयोजक (ॲप) तयार केला आहे.
स्व.यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिनी भाषा संचालनालयाने तयार केलेल्या या “शासन शब्दकोश : भाग-1” या भ्रमणध्वनी उपयोजकाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, शालेय शिक्षण, मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, विधानसभेचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, आमदार भाई गिरकर, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा भांड, ज्येष्ठ समीक्षक डॉ.अरूणा ढेरे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, भाषा संचालक हर्षवर्धन तु. जाधव आदी उपस्थित होते.
भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या शब्द कोशांपैकी शासन व्यवहार कोश, प्रशासन वाक्प्रयोग, न्यायव्यवहार कोश व कार्यदर्शिका हे चार निवडक शब्दकोश पहिल्या टप्प्यात या भ्रमणध्वनी उपयोजकाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपयोजकाद्वारे शासन व्यवहारात व न्यायव्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांना मराठीत अर्थ व पर्याय आणि मराठी शब्दांना इंग्रजीत अर्थ व पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
या भ्रमणध्वनी उपयोजकाची रचना अत्यंत सहज व सुलभ आहे. यासाठी अँड्रॉईड स्वरूपाच्या भ्रमणध्वनीची गरज आहे. हा भ्रमणध्वनी शब्दकोश उपयोजक स्थापित (डाऊनलोड) करून घेण्यासाठीच फक्त नेटची गरज भासेल. एकदा का भ्रमणध्वनी उपयोजक उतरवून (डाऊनलोड) घेतला की, नेटशिवाय कधीही, कोठेही व केव्हाही आपण आपल्या पसंतीचा शब्दकोश व त्यातील इंग्रजी – मराठी व मराठी – इंग्रजी शब्दांचे अर्थ सुलभपणे पाहू शकतो. हा भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअरवरून https://play.google.com/store/apps/details id=gov.maharashtra.shabdkoshapp या दुव्यावरून (लिंक) मोफत स्वरूपात भ्रमणध्वनीमध्ये उतरवून घेता येईल.
Regards
Mr. Pralhad Jadhav
Master of Library & Information Science (NET Qualified)
Senior Manager @ Knowledge Repository
Khaitan & Co
Twitter Handle | @Pralhad161978
Mobile @ 9665911593
very good sir, Thanks
ReplyDelete