अॅप’मधले शिक्षक
विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाशी संबंधित शंका, प्रश्न यांचे निराकरण करण्यासाठी ‘मेरिटनेशन’ हे अॅप उपयुक्त आहे.
आज शिक्षक दिन. विद्यादानासारखे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना वंदन करण्याचा दिवस. शिक्षण हे केवळ शाळेतल्या चार भिंतींपुरतंच मर्यादित नसतं. बालवयापासूनच आपल्याला प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे गुरू भेटत असतात. आई, वडील, भावंडे, मित्र, इतकंच काय, पण अनुभवही आपल्याला पावलोपावली काही तरी नवीन शिकवत असतात, नवं ज्ञान देत असतात. तंत्रज्ञानाचंही तसंच आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनशी आपली जवळीक वाढली असल्यामुळे या माध्यमातूनही आपल्याला जगातील नवीन घडामोडी, गोष्टी समजतात. पण स्मार्टफोनवरून मिळणाऱ्या या ज्ञानाला तुम्ही प्रत्येक वेळी खात्रीशीर आणि सत्य मानू शकत नाही. उलट अलीकडे स्मार्टफोनवरून ज्ञानाचा प्रसार करण्याऐवजी अफवा, असत्य यांचा प्रचार करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. असे असले तरी, स्मार्टफोनवरून खरेखुरे शिक्षण घेणेही सहजशक्य बनले आहे.
Source | Loksatta | 5th September 2019
Regards
Mr. Pralhad Jadhav
Master of Library & Information Science (NET Qualified)
Research Scholar (IGNOU)
Senior Manager @ Knowledge Repository
Khaitan & Co
Twitter Handle | @Pralhad161978
Mobile @
9665911593
No comments:
Post a Comment